IND Vs ZIM – बनेट हिंदुस्थानलाही नडला अन् शेवटपर्यंत लढला! अखेर सूर्याच्या सेनेने मैदान मारलं, 72 धावांनी झिम्बाब्वे पराभूत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नई येथे खेळल्या गेल्या टीम इंडियाविरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात टीम इंडियाने बाजी मारत 72 धावांनी मोठा विजय साजरा केला आहे. या विजयामुळे टीम इंडियाचे सेमीफायनलच्या शर्यतीत आपलं स्थान अधिक भक्कम केलं आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 258 धावांचे तगडे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करतान ब्रायन बनेटने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवून दिला आणि नाबाद 97 धावांची जीगरबाज खेळी केली. इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे संघ कोलमडला आणि त्यांना 20 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावांपर्यंत मजल मारण्यता यश आले. अर्शदीपने नेत्रदीपक गोलंदाजी करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १-१ बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Comments are closed.