रितू तावडेंच्या मनगटावर तब्बल 1 कोटीचं घड्याळ? सोशल मिडीयावर ट्रोल होताच मुंबईच्या महापौरांचं स
रीटा रोलेक्स वॉच शोधत आहे: मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) या सध्या त्यांच्या मनगटावरील घड्याळामुळे चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये त्यांनी परिधान केलेले घड्याळ तब्बल एक कोटी रुपयांचे असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. या दाव्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले आहे.
Ritu Tawde Rolex Watch: नेमकं प्रकरण काय?
व्हायरल फोटोमध्ये दिसणारे घड्याळ हे ‘Rolex येलो गोल्ड डेटोना’ मॉडेलचे असल्याचा दावा करण्यात आला होता. या मॉडेलची किंमत सुमारे 60 ते 70 लाख रुपये असून, भारतातील बाजारमूल्य एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. संबंधित पोस्ट व्हायरल होताच रितू तावडे यांना सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
घड्याळाची आवड असल्यामुळे महापौरच्या हाताकडे लक्ष गेले
एकदम महागडे
पिवळा सोने रोलेक्स डेटोना लाइट डायल
माझ्याकडून रिस्पेक्ट … रिटेल किंमत 60-70 लाख … भारतातली मार्केट किंमत १ करोड पेक्षा जास्त pic.twitter.com/cGvivU9Ofn
— गजाभाऊ (@gajabhauX) 26 फेब्रुवारी 2026
Ritu Tawde Rolex Watch: रितू तावडेचं स्पष्टीकरण
आता महापौर रितू तावडे यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. रितू तावडे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलंय की, ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे.
माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही.
अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे.
अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही. https://t.co/QqeuQWze27 pic.twitter.com/JQJlTQCbff
— वर्तमान रीटा (@PresentRita) 26 फेब्रुवारी 2026
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.