जिगरी यार दारू प्यायला गेले अन्…; 20 रूपयांच्या उधारीवरून मित्रानेच मित्राचा गळा चिरला, रक्त
पिंपरी- चिंचवड: पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Crime News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, अवघ्या 20 रुपयांसाठी मित्राने मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने (Pimpri Crime News) वार करत हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपरी परिसरात घडली आहे. या घटनेत रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड हा गंभीर जखमी झाला असून फरार आरोपी सत्यजित उर्फ सोन्या कांबळे याला पिंपरी पोलिसांनी लातूरमधून अटक केली आहे.(Pimpri Crime News)
रवींद्र गायकवाड आणि सत्यजित कांबळे हे एकमेकांच्या ओळखीचे होते. बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी ‘माझे तुझ्याकडे 20 रुपये उधार आहेत’ असे म्हणत सत्यजितने रवींद्रच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी (Pimpri Crime News) पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक लातूर येथे रवाना झाले आणि अवघ्या काही तासांत त्याला बेड्या ठोकण्यात यश आले. अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येच्या प्रयत्नाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Pimpri Crime News)
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी माहिती देताना सांगितलं की, 26 तारखेला साधारण रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास लकी कंट्री बार पिंपरी गावमध्ये समृद्धी हॉटेलच्या बाजूला आहे तिथे तक्रारदार रमेश गायकवाड हा तिथे दारू पिण्यासाठी गेला होता, त्याच्यासोबत त्याचा मित्र सत्यजित उर्फ सोन्या कांबळे गेला होता. वीस रुपयाच्या उधारीवरून दोघांची भांडण झाले, यावेळी सत्यजित कांबळे यांनी त्याच्या मित्राला रवींद्र गायकवाड याच्या गळ्यावर धारदार शास्त्रने वार केला, त्यानंतर तिथून तो पळून गेला, जखमी झालेल्या रवींद्र गायकवाड याला तात्काळ वाय सी एम हॉस्पिटल येथे दाखल केले, त्याचा जबाब घेण्यात आला आहे, त्याच्या तक्रारीवरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, सत्यजित कांबळे हा फरार होऊन पुण्यामार्गे लातूर येथे गेल्याची माहिती मिळाली, आम्ही तात्काळ पोलीस पाठवून त्याला आज सकाळी तिथून ताब्यात घेतलं आहे. पोलीस त्याला घेऊन पिंपरी येथे येत आहेत. या घटनेचा पुढील तपास आम्ही करत आहोत, आरोपीची फिर्यादीकडे 20 रुपयांचे उधारी होती असं फिर्यादीचं म्हणणं आहे, जेव्हा त्याने त्याच्यावर वार केले त्याचं म्हणणं होतं की माझे तुझ्याकडे २० रुपये उधारी आहे, ते पैसे मला परत दे, आरोपीला आणल्यानंतर तपासानंतर सर्व गोष्टी समोर येतील, अशी माहिती ही पोलिसांनी दिली आहे.(Pimpri Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.