टीम इंडियाचा विजयाचा जल्लोष, पण शिवम दुबेच्या नावावर ‘तो’ नकोसा विक्रम, वाचून विश्वास बसणार नाह
शिवम दुबे T20 विश्वचषक 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने 256 धावांचा प्रचंड डोंगर उभारला आणि सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवलं. मात्र या शानदार विजयामध्ये काही असे विक्रमही नोंदवले गेले, जे संबंधित खेळाडूंना कदाचित विसरून जावंसं वाटेल. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 4 बाद 256 धावा केल्या. हा स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्कोअर ठरला, तसेच टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील भारताचा सर्वोच्च धावसंख्या विक्रम बनला.
शिवम दुबेच्या नावावर नकोसा विक्रम
या मोठ्या विजयावर मात्र शिवम दुबेच्या गोलंदाजीने थोडंसं पाणी फेरलं. त्याने केवळ दोन षटकांत तब्बल 46 धावा खर्च केल्या. 15व्या षटकात त्याला गोलंदाजी देण्यात आली आणि त्या षटकातच त्याने 26 धावा दिल्या. हा भारताकडून टी-20 विश्वचषकात टाकलेला सर्वात महागडा षटक ठरला. याआधी 2007 मध्ये युवराज सिंग याने न्यूझीलंडविरुद्ध एका षटकात 25 धावा दिल्या होत्या.
अभिषेक शर्मा याने 30 चेंडूत 55 धावांची खेळी खेळली. त्यानंतर हार्दिक पांड्या याने 23 चेंडूत नाबाद 50 धावा करत डाव रंगवला. शेवटी तिलक वर्मा याने अवघ्या 16 चेंडूत 44 धावा चोपत भारताला 250 पार नेलं. भारताची फलंदाजी इतकी आक्रमक होती की झिम्बाब्वेचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले.
होय, दुबे आजची रात्र खरोखर महाग झाली.
पण याचा अर्थ तो वाईट गोलंदाज आहे असे नाही. आयपीएल 2025 नंतर त्याने बॉलवर चांगली कामगिरी केली आहे.
जेव्हा कर्णधार त्याचा योग्य वापर करतो तेव्हाच दुबेचा चेंडूतील सर्वोत्तम खेळ बाहेर येतो.
अशा सपाट खेळपट्टीत दुबेची भूमिका नाही.
दुबे यांचा वापर जरूर… pic.twitter.com/RHsY8bmhu1
— प्रत्युष हलदर (@pratyush_no7) 26 फेब्रुवारी 2026
झिम्बाब्वेची झुंज अपुरी
257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. ब्रायन बेनेटने 59 चेंडूत नाबाद 97 धावांची अप्रतिम खेळी केली, पण त्यांना दुसऱ्या टोकावरून हवी तशी साथ मिळाली नाही. कर्णधार सिकंदर रजाने 31 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत अर्शदीप सिंग याने 4 षटकांत 24 धावा देत 3 विकेट्स घेतले. तसेच वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल याने प्रत्येकी एक विकेट घेत भारताचा विजय अधिक भक्कम केला.
शिवम दुबेने झिम्बाब्वेविरुद्ध चेन्नईतील सुपर 8 सामन्यात दोन षटकात 46 धावा दिल्या.
2020 मध्ये, त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या T20I मध्ये एकाच षटकात 34 धावा दिल्या होत्या, तरीही एका T20I षटकात भारतीय गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत.#ShivamDube… pic.twitter.com/DvcLSwmWo6
— CricTracker (@Cricketracker) 26 फेब्रुवारी 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.