Nepal Earthquake – नेपाळमध्ये 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे नातावरण
नेपाळमध्ये शुक्रवारी पहाटे भूकंपाचा तीव्र धक्के बसला. भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी होती. काठमांडूपासून 400 किमी अंतरावर असलेल्या संखुवासभा जिल्ह्यात पहाटे 3 वाजून 18 मिनिटांनी 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप देखरेख आणि संशोधन केंद्र (NEMRC) ने दिलेल्या माहितीनुसार संखुवासभा-ताप्लेजंग सीमा भागातील टोपके गोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
भोजपुर, पंचथर आणि तेहरथुम या शेजारील जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा धक्का बसताच नागरिक घाबरून घराबाहेर पळाले. भूकंपामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, हिंदुस्थानातील सिक्किम राज्यातही गुरुवारी 4.6 आणि 3.5 तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के जाणवले.
Comments are closed.