एक सामना… दोन समीकरणं… अन् पाकिस्तानचं टांगणीला लागलेलं स्वप्न! इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड ठरवणा
पाकिस्तान सेमी-फायनल पात्रता परिस्थिती ENG विरुद्ध NZ सामना : पाकिस्तानचा टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील प्रवास शुक्रवारीच संपुष्टात येऊ शकतो. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार असून, या सामन्याच्या निकालावरच पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा पूर्णपणे अवलंबून आहेत. सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला सुपर 8, ग्रुप-2 मध्ये अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. उलट इंग्लंडने सलग दोन सामने जिंकत आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. पाकिस्तानचा सुपर 8 मधील शेवटचा सामना शनिवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
समीकरण – १
जर इंग्लंडने शुक्रवारी न्यूझीलंडचा पराभव केला आणि पाकिस्तानने आपल्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला हरवले, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे प्रत्येकी तीन गुण होतील. अशा वेळी निकाल नेट रनरेटवर ठरेल. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल, तर न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागेल आणि पाकिस्तानने स्वतः श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवणे आवश्यक असेल. तेव्हाच तो नेट रनरेटमध्ये कीवी संघाला मागे टाकू शकेल.
समीकरण – 2
जर न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केले, तर पाकिस्तान श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळण्यापूर्वीच स्पर्धेबाहेर जाईल. कारण गुणतालिकेत तो न्यूझीलंडशी बरोबरी साधू शकणार नाही. तसेच इंग्लंड-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला, तरीही पाकिस्तानचा मार्ग बंद होईल. जरी त्याने शेवटचा सामना जिंकला तरीही.
न्यूझीलंडने श्रीलंकेवर 61 धावांनी मोठा विजय मिळवत आपला नेट रनरेट +3.050 इतका मजबूत केला आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना फक्त मोठ्या फरकाने पराभव टाळायचा आहे. दुसरीकडे, इंग्लंड आधीच अंतिम चारमध्ये दाखल झाला असला तरी विजयी लय कायम ठेवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. हा सामना न्यूझीलंडसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मात्र पाकिस्तानसाठीही तो तितकाच निर्णायक आहे, कारण याच निकालावर त्यांच्या विश्वचषकातील प्रवासाचा शेवट ठरणार आहे.
भारत आणि विंडिजमध्ये ‘करो या मरो’ची लढत
टीम इंडियाने झिम्बाब्वेचा पराभव केल्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेला मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांत दोन विजयांसह 4 गुण मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून आपले सेमीफायनलचे तिकीट पक्के केले आहे. मात्र, याच ग्रुपमधून दुसऱ्या जागेसाठी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात काट्याची टक्कर आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज 2 सामन्यांत 2-2 गुणांसह शर्यतीत कायम आहे. 1 मार्चला दोन्ही संघ भिडणार आहेत. जो कोणी सामना जिंकले, तो थेट सेमीफायलनसाठी पात्र होईल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.