Photo – चौकार-षटकारांची आतिषबाजी; टी-20 वर्ल्डकपमधील टीम इंडियाचे ‘टॉप 5’ हाय-स्कोअर!
चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या सुपर-8 लढतीमध्ये हिंदुस्थानने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि 20 षटकात 256 धावांचा डोंगर उभारला. टी-20 वर्ल्डकप इतिहासातील हा हिंदुस्थानचा सर्वोच्च स्कोअर ठरला. त्यानंतर झिम्बाब्वेला 184 धावांमध्ये रोखत 72 धावांनी विजयही मिळवला. चेपॉकवर झालेला सामना खऱ्या अर्थाने फलंदाजांनी गाजवला. याच निमित्ताने टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये नोंदवलेले 5 सर्वोच्च स्कोअर कोणते ते पाहूया.
1. 4 बाद 256 धावा विरुद्ध झिम्बाब्वे (2026, चेन्नई)

अभिषेक शर्मा (55), हार्दिक पांड्या (50*) आणि तिलक वर्मा (44*) यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर हिंदुस्थानने 4 बाद 256 धावा केल्या. टी-20 वर्ल्डकप इतिहासातील हिंदुस्थानचा आतापर्यंतचा हा सर्वोच्च स्कोअर ठरला आहे.
2. 4 बाद 218 धावा विरुद्ध इंग्लंड (2007, डर्बन)

2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये डर्बनच्या मैदानावर युवराज सिंह नावाचे वादळ घोंघावले होते. या लढतीत हिंदुस्थानने 20 षटकात 218 धावा केल्या होत्या. या लढतीत युवराजने स्टूअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात 6 षटकार ठोकच 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. हा सामना हिंदुस्थानने 18 धावांनी जिंकला होता.
3. 2 बाद 210 धावा विरुद्ध अफगाणिस्तान (2021, अबुधाबी)

2021 च्या वर्ल्डकपमध्ये अबुधाबीत हिंदुस्थानचा सामना अफगाणिस्तानशी झाला होता. या लढतीत केअल राहुल (69) आणि रोहित शर्मा (74) यांनी 140 धावांची सलामी दिली होती. या दोघांच्या खेळीच्या बळावर हिंदुस्थानने 20 षटकात 210 धावा उभारल्या होत्या. हिंदुस्थानने हा सामना 66 धावांनी जिंकला होता.
4. 9 विरुद्ध नामिबिया (2026, दिल्ली) नंतर 209 धावा

2026 च्या वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानने नामिबियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. दिल्लीत झालेल्या लढतीत ईशान किशन याने चौफेर फटकेबाजी करत 24 चेंडूत 61 धावा फटकावल्या होत्या. या बळावर हिंदुस्थानने 9 बाद 209 धावा चोपल्या आणि नामिबियाला झटपट गुंडाळत 93 धावांनी विजय मिळवला होता.
5. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 नंतर 205 धावा (2024, सेंट लुसिया)

2024 च्या वर्ल्डकपमध्ये सेंट ल्युसिया येथे हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 बाद 205 धावा केल्या होत्या. त्यावेळी कर्णधार असलेल्या रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची झंझावाती खेळी केली होती. हा सामना हिंदुस्थानने 24 धावांनी जिंकला होता.
Comments are closed.