ENG vs NZ: सेमीफायनलपूर्वीच सोडणार संघाची साथ! ‘या’ महत्त्वाच्या कारणामुळे न्यूझीलंडचा स्टार खेळाडू अचानक मायदेशी परतणार

टी20 विश्वचषक 2026 (Icc T20 international world cup 2026) आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच उपांत्य फेरीचे (Semi-finals) चार संघ निश्चित होतील. अशा महत्त्वाच्या वेळी न्यूझीलंड संघासाठी एक चिंतेची बातमी आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री (Mat Henry) कौटुंबिक कारणामुळे अचानक मायदेशी परतत आहे.

मॅट हेन्री लवकरच बाबा होणार आहे, त्यामुळे त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज इंग्लंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना खेळल्यानंतर तो न्यूझीलंडला रवाना होईल. जर न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर तो पुन्हा संघात सामील होण्याची शक्यता आहे, परंतु सध्या तरी तो उपलब्ध नसेल.

आज शुक्रवारी कोलंबोमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुपर-8 चा सामना रंगणार आहे. या सामन्यावर न्यूझीलंडचे भवितव्य अवलंबून आहे. या सामन्यात न्यूझीलंड जिंकल्यास संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. पण, न्यूझीलंड हरल्यास पेच निर्माण होऊ शकतो. अशा स्थितीत पाकिस्तान आणि न्यूझीलंड पैकी एकच संघ पुढे जाईल. इंग्लंडने आधीच आपली जागा निश्चित केली आहे.

न्यूझीलंडकडे सध्या 3 गुण आहेत. जरी ते आजचा सामना हरले, तरी पाकिस्तानचा नेट रन रेट खराब असल्याने न्यूझीलंडचे पारडे जड आहे. मात्र, मोठा पराभव टाळणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे.

Comments are closed.