मुंबई उपनगरातील 22 ते 25 शाळांना धमकीचा ई-मेल, परिसरात घबराट
मुंबई उपनगरातील 22 हून अधिक शाळांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच घबराट उडाली आहे. दहिसर येथील जेबीएनसी आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बस्फोटने धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. सदर परिस्थिती लक्षात घेता पोलिसांच्या माध्यमातून तातडीने शाळेच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरातील 22 ते 25 शाळांना अशाच प्रकारे धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीताचे वातावरण आहे. याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पाहायला मिळाले. सर्व प्रकारणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत या सर्व प्रकरणाची तपासणी केली जाईल आणि मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जाईल, असे अश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनता दिले. या सर्व प्रकारामुळे शहरातील शाळांभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी पालकांना केलं आहे.
Comments are closed.