शिखर बँक घोटाळा; सुनेत्रा पवार, अजितदादांसह 70 जणांना क्लीन चिट, सत्र न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत अजित पवारांसह 70 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी नव्याने तपास करत आर्थिक गुन्हे शाखेने 35 पानी सीसमरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) विशेष न्यायालयात सादर केला. अतिरिक्त न्यायाधीश महेश जाधव यांनी हा अहवाल आज स्वीकारला.

राज्य सहकारी बँकेने  2005 ते 2010 या कालावधीत मोठय़ा प्रमाणात सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना कर्ज दिले होते. ही सर्व कर्ज बुडित निघाली होती. बँकेचे तत्कालीन संचालक असलेल्या अजित पवारांसह 70 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 25 हजार रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यानंतर ईओडब्ल्यूने नव्याने तपास करायचा आहे, असा अर्ज न्यायालयात केला. याप्रकरणी ईओडब्ल्यूने पुन्हा तपास केला. या तपासात काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे तपास बंद अहवाल सादर केला. सत्र न्यायालयाने हा अहवाल स्वीकारला.

Comments are closed.