इंग्लंडने ताटात दिलं, पण पाऊस करणार पाकिस्तान गेम! SL vs PAK सामन्यात रद्द झाला तर कोण जाणार से

T20 विश्वचषक 2026 सेमीफायनलची परिस्थिती : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये शनिवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणारा सामना केवळ औपचारिक नाही, तर पाकिस्तानसाठी “करो या मरो”ची लढाई ठरणार आहे. श्रीलंकेचा प्रवास जवळपास संपला असला, तरी पाकिस्तानच्या आशा अजूनही जिंवत आहेत. इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्यामुळे समीकरण रंगतदार झाले आहे. आता सगळ्यांच्या नजरा पल्लेकेलेवर खिळल्या आहेत.

पाकिस्तानसमोर मोठं आव्हान

या स्पर्धेत 28 फेब्रुवारीचा दिवस पाकिस्तानसाठी निर्णायक आहे. सध्या न्यूझीलंडकडे 3 गुण आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 1 गुण. जर पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला, तर त्यांचेही 3 गुण होतील आणि मग नेट रन रेटवर निकाल ठरेल.

पण इथेच खरा ट्विस्ट…

पाकिस्तानचा नेट रन रेट खूपच खराब आहे. त्यामुळे त्यांना श्रीलंकेला किमान 64 धावांनी पराभूत करणे किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना 13.1 षटकांत विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी फरकाने जिंकल्यास, विजय मिळूनही पाकिस्तानचे विश्वचषक स्वप्न भंगणार आहे.

पावसाचा डाव रंगला तर?

जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचे गुण 4 होतील आणि पाकिस्तान 2 गुणांवरच थांबेल. म्हणजे कोणतेही गुंतागुंतीचे गणित न करता न्यूझीलंड थेट उपांत्य फेरीत पोहोचेल आणि पाकिस्तानचा प्रवास इथेच संपेल.

पल्लेकेलेचे हवामान काय सांगते? (Weather in Pallekele Today?)

याआधी काही सामने कोलंबोमध्ये पावसामुळे रद्द झाले होते, मात्र हा सामना पल्लेकेले येथे खेळवला जाणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 28 फेब्रुवारीला संध्याकाळी पावसाची कोणतीही शक्यता नाही. म्हणजे सामना निर्विघ्नपणे पार पडण्याची दाट शक्यता आहे.

हे ही वाचा –

T20 World Cup 2026 Semi Final : विजयाचं समीकरण ठरलं, सेमीफायनलचं रणशिंग फुंकलं; इंग्लंडशी भिडणार टीम इंडिया… अट फक्त एकच

आणखी वाचा

Comments are closed.