व्यापार वाढल्यास सीमाशुल्क बदलेल
महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव यांचे संकेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सीमाशुल्कांमध्ये पुढील सुधारणा भागधारकांमधील अधिक विश्वास आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असाव्यात, कारण भारताची व्यापार व्यवस्था अधिक गुंतागुंतीची आणि डिजिटल होत आहे, असे दिल्लीत आयोजीत सीमाशुल्क सुधारणांवरील राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव यांनी सांगितले. भारताचा व्यापार वाढत आहे आणि जागतिक मूल्य साखळींमध्येदेखील प्रवेश अधिक वाढत आहे. यामुळे आर्थिक प्रवासातील या महत्त्वाच्या टप्प्यावर प्रशासनासाठी नवीन मागण्या निर्माण होत असल्याचेही यावेळी सचिव श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना श्रीवास्तव म्हणाले, की, ‘या परिवर्तनात सीमाशुल्क प्रशासनाचे विशेष स्थान आहे. ते केवळ एक नियामक प्राधिकरण नाही तर आर्थिक वाढीला चालना देणारी, पुरवठा साखळी मजबूत करणारी ठरणार असून येत्या काळात समाजातील व्यापार क्षेत्राचे संरक्षण करणारी आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची भारताची क्षमता वाढवणारी संस्था म्हणून उदयास येणार असल्याचेही ते म्हणाले.’
Comments are closed.