T20 WC26: दक्षिण आफ्रिकेच्या यशामागचे रहस्य आले समोर! कगिसो रबाडानेच केला खुलासा

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या हंगामात दक्षिण आफ्रिका चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्यांनी साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत धमाक्यात सुपर-८ची फेरी गाठली. यामध्येही त्यांनी पहिल्याच सामन्यात गतविजेता भारताला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर दोन वेळेचा टी२० विश्वचषक विजेता आणि बलाढ्य वेस्ट इंडिजलाही पराभूत केले आणि उपांत्य फेरी गाठली. त्यांच्या या यशामागे केवळ फलंदाजच नाहीतर गोलंदाजांचेही मोठे योगदान राहिले आहे. संघाच्या यशाचे रहस्य आता समोर आले. त्यांच्याच वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने ते उलगडले आहे.
रबाडा या स्पर्धेत साजेशी कामगिरी करू शकत नाही, मात्र संघाच्या यशाने तो खूप आनंदी आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध ९ विकेट्सने विजय मिळवल्यावर त्याने वैयक्तिक विक्रमापेक्षा संघाचे प्रदर्शन अधिक महत्वाचे आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत ४ विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे त्याचे म्हणणे आहे की जर संघ जिंकत असले तर ही आकडेवारी काही महत्वाची नाही.
या स्पर्धेत रबाडाने गोलंदाजी उत्तम केली, मात्र त्याला क्षेत्ररक्षकांकडून हवी तशी मदत मिळाली नाही. त्याच्या गोलंदाजीवेळी अनेक झेल सुटले आहेत. तो एक खेळाचा भाग असून कधी-कधी नशीब साथ देत नाही आणि असे होते. त्याने पुढे संघातील युवा खेळाडू आणि अनुभवाचा कसा समतोल आहे, जो संघाच्या विजयात महत्वाची भुमिका ठरत आहे हे स्पष्ट केले आहे.
डेविड मिलरने कसे संघाला एका सामन्यात जिंकून दिले आणि दुसरीकडे कर्णधार एडेन मार्करमनेही उत्तम नेतृत्व करत दुसऱ्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाजीत मार्को यान्सेन आणि लुंगी एनगिडी यांनी वेळेवर विकेट्स काढत संघाला मजबूत केले आहे.
“दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा आत्मविश्वासच त्यांची मोठी ताकद आहे”, असे रबाडाने म्हटले आहे. यावेळी त्याने स्थानिक टी२० लीग एसए२०मुळे कसे खेळाडू या स्पर्धेआधी फॉर्ममध्ये आले, हे पण सांगितले.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीतील वेगळेपण हे पण सध्या त्यांच्या सामना जिंकण्याचे मोठे कारण आहे. वेगवेगळ्या गोलंदाजांनी वेगवेगळ्या परिस्थितीत विरोधी संघांना आव्हान दिले. आता उपांत्य फेरीत या कामगिरीत सातत्य राखण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असणार आहे. ज्यामुळे मागील अनेक वर्षांपासून विश्वचषक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न अखेर पूर्ण होईल.
Comments are closed.