Pakistan Afghanistan War – शहबाज शरीफ, असीम मुनीर महान व्यक्ती; पाकिस्तानला उघड पाठिंबा देत ट्रम्प यांनी आगीत तेल ओतलं
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. सीमेवर दोन्ही बाजूने तोफगोळ्यांचा पाऊस पाडला जात आहे. दोन्ही बाजूने मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याचा दावा केला जात आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी या युद्धात उडी घेतली असून पाकिस्तानला उघड पाठिंबा जाहीर केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर हे महान व्यक्ती असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धात तेल ओतण्याचे काम केले आहे.
अफगाणिस्तानमधील काबूल, कंदाहार आणि पक्तिया या शहरांवर पाकिस्तानने एअरस्ट्राइक करून उघड युद्धाची घोषणा केली आहे. या संघर्षात दोन्ही बाजूंचे नागरिक मारले जात असताना ट्रम्प यांनी मात्र पाकिस्तानचे गोडवे गायले आहेत. पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली.
“मी हस्तक्षेप करीन. पण माझे पाकिस्तानशी खूप खूप घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्याकडे एक उत्तम पंतप्रधान आणि एक उत्तम जनरल आहेत. त्यांच्याकडे एक उत्तम नेता आहे. हे असे दोन लोक आहेत ज्यांचा मी मनापासून खूप आदर करतो. पाकिस्तान विलक्षण कामगिरी करत आहे”, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
#पाहा | पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, “मी (हस्तक्षेप करेन). पण मी पाकिस्तानसोबत खूप चांगले आहे. त्यांच्याकडे एक महान पंतप्रधान आहे, एक महान जनरल आहे. त्यांच्याकडे एक महान नेता आहे. त्यांच्यापैकी दोन लोक ज्यांचा मी खूप आदर करतो. पाकिस्तान… pic.twitter.com/LjPXCVmdJs
— ANI (@ANI) २७ फेब्रुवारी २०२६
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या सचिव अॅलिसन हूकर यांनीही पाकिस्तानच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन केले आहे. तालिबानी हल्ल्यांविरोधात पाकिस्तान जे काही करत आहे, त्याला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे
…अन् युद्धाचा भडका उडाला
पाकिस्तानने दहशतवादी अड्ड्यांच्या नावाखाली अफगाणिस्तानमधील शहरांवर हवाई हल्ले केले. यात अनेक नागरिक मारले. याचा बदला घेण्यासाठी अफगाणिस्तामधील तालिबान सरकारने पाकिस्तान सीमेवरील चौक्या उद्ध्वस्त केल्या. यावेळी उडालेल्या चकमकीत 55 सैनिक झाले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने उघड युद्धाची घोषणा करत हल्ले तीव्र केले. या हल्ल्यात अफगाणिस्तानचे 200 हून अधिक सैनिक ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
Comments are closed.