मोठी बातमी – इस्रायलचा इराणवर हल्ला; तेहरानमध्ये स्फोट, हवाई हल्ल्याचे सायरन वाजण्यास सुरुवात
इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी सकाळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले असून शहरातील काही भागांमध्ये धुराचे लोट उठताना दिसत आहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणवर हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून देशभर आणीबाणी घोषित केली आहे.
इराणची राजधानी तेहरानच्या मध्यवर्ती भागात शनिवारी सकाळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले. शहरातील काही भागांतून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. इराणमधील स्फोटांनंतर इस्रायलमध्येही संभाव्य प्रत्युत्तराच्या भीतीने देशभर धोक्याचे सायरन वाजवण्यात आले असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
इस्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ला केला आहे, असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. इस्रायलच्या सैन्याने सांगितले की त्यांनी “इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्याच्या शक्यतेसाठी जनतेला तयार करण्यासाठी” देशभरातील भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले होते…
— ANI (@ANI) 28 फेब्रुवारी 2026
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने ट्विट केले, “गेल्या काही मिनिटांत, संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजवण्यात आले होते, ज्यामध्ये थेट सेल्युलर उपकरणांना सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी आगाऊ सूचना देण्यात आल्या होत्या. या संभाव्यतेसाठी जनतेला तयार करण्यासाठी हा एक सक्रिय इशारा आहे… pic.twitter.com/KWc1pDlFAo
— ANI (@ANI) 28 फेब्रुवारी 2026
Comments are closed.