श्रद्धा कपूर घरासाठी मोजणार 6 लाख रुपये भाडे
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही मुंबईतील जुहू येथे भाडय़ाच्या घरात राहत असून तिने या घरासाठी आणखी एका वर्षाचा करारनामा वाढवला आहे. या घरासाठी ती दर महिन्याला 6 लाख रुपये भाडे देणार आहे. या नव्या करारनाम्याची नोंदणी नुकतीच करण्यात आली आहे.
श्रद्धाने हेच अपार्टमेंट गेल्या वर्षी भाडय़ाने घेतले होते. आता पुन्हा 12 महिन्यांचा करार करण्यात आला आहे. यासाठी एपूण भाडे 72 लाख रुपये असणार आहे. हे घर जुहूच्या प्राइम बीच परिसरात असून 3 हजार 929 फुटांचे आहे. यासोबत 4 कार पार्किंग आहेत. नवीन करारानुसार, स्टँम्प डय़ुटी म्हणून 36 हजार आणि नोंदणी शुल्क म्हणून 1 हजार रुपये भरले आहेत.
Comments are closed.