रामायण मधील सीता ठरलेली दीपिका आता झाली सासूबाई, तर लेकीच्या लग्नातील काही झलक केली शेअर.. – Tezzbuzz
रामायण ही सिरीयल भारतात प्रचंड गाजली आणि आजही प्रेक्षकांच्या हृदयावर ती राज्य करते. तसेच यातील कलाकारांना या सिरीयलने प्रचंड ओळख निर्माण करून दिली. त्यामुळे प्रेक्षक आजही या कलाकारांना देवासारखेच मानतात. तर यातील सीताचा रोल केलेले अभिनेत्री म्हणजे दीपिका चिखलिया हि आहे. तर तिची मुलगीचे जुही हिचे नुकतेच लग्न झाले आहे. ज्याची एक झलक अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या मुली आणि जावयाला त्यांच्या नवीन सुरुवातीबद्दल अभिनंदन केले आहे.
दीपिका (deepika)चिखलियाने तिच्या जावयाचे “मिथिला का कान कान खिला” या नृत्याने स्वागत केले, तर इतर फोटो आणि व्हिडिओमध्ये ती तिच्या मुलीच्या लग्नाचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. काही फोटोंमध्ये, अभिनेत्री तिच्या मुलीच्या निरोपाच्या वेळी भावनिक देखील दिसली. तिने लग्नाच्या रिसेप्शनपासून ते मंडप आणि निरोपापर्यंतच्या लग्नाच्या मिरवणुकीची झलक चाहत्यांसह शेअर केली, ज्यावर सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
दीपिका चिखलियाने तिच्या मुलीचे लग्न एका खाजगी समारंभात केले. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या दीपिकाने तिच्या मुलीचे लग्न इतके खाजगी ठेवले की कोणालाही लक्षातही आले नाही. दीपिका चिखलियाबद्दल बोलायचे झाले तर, तिने 1991 मध्ये व्यावसायिक हेमंत टोपीवालाशी लग्न केले. हेमंत टोपीवाला शृंगार बिंदी आणि कॉस्मेटिक्सचे मालक आहेत. या जोडप्याला निधी आणि जुही या दोन मुली आहेत. दीपिका अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात असते, परंतु तिच्या दोन्ही मुली आणि पती प्रसिद्धीच्या झोतात राहत नाहीत. दीपिकाच्या मुलींच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, निधी ही एक व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहे आणि जुही तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
केरळ स्टोरी 2; वादात अडकूनही द केरळ स्टोरी 2 ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
Comments are closed.