T20 WC 2026 – कोलकात्याच्या हवामानाने वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, सामना पावसामुळं रद्द झाला तर सेमीफायनलला कोण पोहोचणार?

हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा आगामी सामना म्हणजे ‘क्वार्टर फायनल’च आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या लढतीत विजय मिळवला, तर टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा होईल. मात्र, पराभव झाल्यास गाशा गुंडाळावा लागेल. अशातच आता चाहत्यांच्या नजरा मैदानातील खेळापेक्षा आकाशाकडे जास्त लागल्या आहेत. पाऊस या सामन्यात खोडा घालणार का, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

चेन्नईच्या चेपॉक मैदानात झालेल्या दुसऱ्या सुपर-8 लढतीत झिम्बाब्वेला 72 धावांनी धूळ चारल्यानंतर टीम इंडियाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता समोर शाई होपची विंडीज सेना आहे. हिंदुस्थानला फक्त हा सामना जिंकायचा आहे आणि सेमीफायनलचे तिकीट खिशात टाकायचे आहे. पण, जर पावसाने खेळ बिघडवला आणि सामना रद्द झाला, तर मात्र हिंदुस्थानचे स्वप्न अधुरे राहू शकते. कारण दोन्ही संघांचे सध्या प्रत्येकी 2 गुण आहेत. सामना रद्द झाल्यास दोघांना 1-1 गुण मिळेल, पण ‘नेट रन रेट’च्या जोरावर वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये धडक मारेल.

कोलकातामध्ये सुरुवातीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र ताज्या अपडेटनुसार क्रिकेटप्रेमींसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 1 मार्च रोजी कोलकात्यात पावसाची शक्यता नसल्याचे समोर आले आहे. तापमान दिवसा 34 अंश सेल्सिअस, तर सामन्याच्या वेळी 25-26 अंशांपर्यंत घसरू शकते. तसेच आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून चाहत्यांना पूर्ण सामन्याचा आनंद घेता येईल.

T20 WC 2026 – पुन्हा ‘तोच’ सामना रंगणार

कुणाला मिळणार संधी?

दरम्यान, अंतिम 11 मध्ये कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि रिंकू सिंह यांना विंडीजविरुद्ध विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. सुंदरची कामगिरी यथातथाच राहिली असून रिंकूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे तो खेळणार की नाही हे निश्चित नाही. हिंदुस्थानने झिम्बाब्वेविरुद्ध उतरवलेला संघच विंडीजविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानी संघ –

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिजचा संघ –

शाई होप (कर्ंधर), ब्रँडन किंग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती, शमर जोसेफ, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोस्टन चेस, जॉन्सन चार्ल्स.

T20 WC 2026 – पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीची संधी; आज कॅण्डीत पाकिस्तान-श्रीलंका सामना

Comments are closed.