रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राईज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेली जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर कायमचे एकमेकांचे झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर, ही जोडी शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकली. त्यांच्या या लग्नामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच, या नवविवाहित जोडप्याने आपल्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. रश्मिका आणि विजय लवकरच ‘रणबाली’ या चित्रपटात पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

बऱ्याच वर्षांनंतर ही जोडी एकत्र काम करणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. आज ‘रणबाली’ चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि ‘ओ मेरे साजन’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात रश्मिका आणि विजयची जबरदस्त आणि अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळत असून, लग्नानंतर चाहत्यांसाठी ही एक मोठी भेट मानली जात आहे. चित्रपट निर्मात्यांनी या सिनेमाचे पोस्टर रिलीज करत या जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

‘डिअर कॉमरेड’ या चित्रपटानंतर विजय आणि रश्मिकाला एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना तब्बल ७ वर्षे वाट पाहावी लागली. राहुल सांकृत्यान यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. रश्मिका मंदाना सध्या ‘रणबाली’ व्यतिरिक्त ‘कॉकटेल २’ या प्रोजेक्टमध्येही व्यस्त आहे. सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Comments are closed.