IND vs WI: सेमीफायनलचं तिकीट की स्पर्धेतून एक्झिट? उद्याच्या महामुकाबल्यात टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंवर राहणार चाहत्यांच्या नजरा!

कोलकाता येथे 1 मार्च रोजी भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात टी-20 (icc T20 international world cup 2026) विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाचा सामना होणार आहे. या सामन्यात जो जिंकेल, तो संघ उपांत्य फेरीत (Semi-final) प्रवेश करेल, तर पराभूत होणाऱ्या संघाचा स्पर्धेतील प्रवास संपेल. संपूर्ण देशाचे लक्ष या सामन्याकडे लागले असून टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.

झिम्बाब्वेविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर संजू सॅमसन (Sanju Samson & Abhishek Sharma) आणि अभिषेक शर्मा पुन्हा एकदा डावाची सुरुवात करताना दिसू शकतात. फलंदाजीची जबाबदारी ईशान किशन, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि फॉर्मात असलेला तिलक वर्मा यांच्यावर असेल.

तिलक वर्माने गेल्या सामन्यात 16 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या होत्या. संघात हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे तीन अष्टपैलू खेळाडू असू शकतात, जे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत माहिर आहेत. मुख्य गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती यांच्या खांद्यावर असेल.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.

Comments are closed.