टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा आहे? आतापर्यंत इतक्या वेळा झालीय आमनेसामने लढत!

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world Cup 2026) मध्ये भारतीय संघाला सुपर-8 च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धचा सामना 72 धावांनी जिंकून टीम इंडियाने सेमीफायनलच्या शर्यतीतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.

आता भारताचा सुपर-8 मधील तिसरा आणि शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध (India vs West Indies) कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला ‘व्हर्च्युअल क्वार्टर फायनल’ मानले जात आहे, कारण जो संघ हा सामना जिंकेल, तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतीय संघाचा रेकॉर्ड जवळपास सर्वच देशांविरुद्ध चांगला आहे, पण वेस्ट इंडिजच्या बाबतीत चित्र वेगळे आहे. आकडेवारीनुसार
भारताने टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यापैकी भारताला फक्त 1 सामन्यात विजय मिळवता आला आहे, तर 3 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. हा खराब रेकॉर्ड पाहता, भारतीय संघ वेस्ट इंडिजला हलक्यात घेण्याची चूक करू शकत नाही.

टी-20 वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने:

2009: वेस्ट इंडिज 7 विकेट्सनी विजयी.
2010: वेस्ट इंडिज 14 धावांनी विजयी.
2014: भारत 7 विकेट्सनी विजयी.
2016: वेस्ट इंडिज 7 विकेट्सनी विजयी.

वर्ल्ड कपमधील रेकॉर्ड खराब असला तरी, एकूण टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (Head to Head) भारतीय संघ सरस आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात एकूण 30 सामने खेळले गेले आहेत त्यात भारताने 19 तर वेस्ट इंडिजने 10 विजय मिळविले आहेत तर एक
सामना रद्द झाला होता.

Comments are closed.