मुंबई-गोवा महामार्गाला मे महिन्याची डेडलाइन!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या बारा वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर बायपासचा अपवाद वगळता हा मार्ग मेपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज विधान परिषदेत दिले.

गोवा महामार्गाच्या कामाबाबत विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी प्रश्न विचारला होता. तर शिमग्याला गावी जाणाऱया कोकणवासीयांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. मुंबई-गोवा महामार्गानंतरचा समृद्धी महामार्ग झाला. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे महामार्ग रखडला. हा मार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार, असा सवाल भाजपचे प्रवीण दरेकर यांनी विचारला. मंत्री भोसले यांनी त्यावर उत्तर देताना, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची वस्तुस्थिती मांडली.

Comments are closed.