इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू, जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी कारवाईत मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. “जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाला असून इराणच्या जनतेसाठी हा न्यायाचा दिवस आहे,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर ही घोषणा केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही खामेनी ट्रम्प यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. मात्र, इराणने हा दावा फेटाळून लावत खामने जीवंत असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी पोस्ट केले, “इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींपैकी एक खमेनेई मरण पावला आहे. हा केवळ इराणच्या लोकांसाठीच नाही, तर सर्व महान अमेरिकन लोकांसाठी आणि जगभरातील अनेक देशांतील लोकांसाठी न्याय आहे, ज्यांना खमेनेईने मारले किंवा विकृत केले आहे… pic.twitter.com/JkUKxkKmQP
— ANI (@ANI) 28 फेब्रुवारी 2026
Comments are closed.