इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू; इराणी माध्यमांची पुष्टी, 40 दिवसांचा शोक जाहीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला होता. सुरुवातीला इराणने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र इराणी माध्यमांनी याच पुष्टी दिली आहे.

इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA आणि मुख्य वृत्तवाहिनी ‘प्रेस टीव्ही’ने अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. इस्रायल-इराणने केलेल्या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये 40 दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये खामेनी यांच्यासह त्यांच्या घरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांची मुलगी, जावई, सून आणि नात यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिले आहे.

Comments are closed.