'टाइम बॉन्ड' मध्ये ठेव आहे…

बँकांमध्ये पैशाची ठेव ठेवली जाते, हे प्रत्येकाला माहीत आहे. बँकेत काहीवेळा  सुरक्षेच्या कारणास्तव सोने किंवा मौल्यवान वस्तूही ठेवल्या जातात. त्यांच्या तारणावर कर्जही घेतले जाते. तथापि, पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगढ येथे एक अशी बँक आहे की ज्या बँकेत आपण वेळ किंवा समय जमा करु शकता. त्यामुळे या बँकेला ‘टाईम बँक’ असे नाव देण्यात आले आहे. या बँकेत लोक आपला ‘समय’ किंवा ‘वेळ’ डिजिटल खात्यांमध्ये अन्य लोकांच्या साहाय्याने जमा करतात. नंतर त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना या समयाची आवश्यकता भासल्याने ते तो या बँकेतून काढून उपयोगात आणू शकतात. हे  सर्व आपल्याला आ़श्चर्यकारक किंवा खोटे वाटल्याशिवाय राहणार नाही. असे कसे शक्य आहे, हा प्रश्न आपल्या मनात येईलच. त्याच्या उत्तरासाठी या बँकेची कार्यपद्धती समजून घेण्याची आवश्यकता आहे. ही बँकेची विशिष्ट रीत आहे.

येथे लोक आपला वेळ देऊन दुसऱ्यांची कामे करतात. एखाद्या व्यक्तीला एखादे महत्वाचे काम करायचे आहे, तथापि, ते काम करण्यासाठी त्याच्याकडे सध्या वेळ नाही. अशी व्यक्ती ते काम या बँकेत जाऊन दुसऱ्या व्यक्तीकडून करुन घेऊ शकते. म्हणजेच, त्या व्यक्तीचा वेळ उपयोगात आणू शकते. जितका वेळ ती व्यक्ती या कामासाठी व्यतीत करते. तितका वेळ तिच्या खात्यावर जमा होतो.  नंतर कधी या व्यक्तीला तिचे महत्वाचे काम करण्यासाठी वेळ मिळाला नाही, तर ती व्यक्ती आपण आधीच्या कामामुळे जमा केलेला वेळ अन्य व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या कामासाठी उपयोगात आणू शकते. थोडक्यात सांगायचे, तर ही बँका तुम्हाला तुमच्या महत्वाच्या कामांसाठी इतरांचा वेळ पुरविते. या वेळेची परतफेड तुम्ही नंतर त्या व्यक्तींना आवश्यकता असताना तुमचा तेव्हढाच वेळ त्यांच्यासाठी व्यतीत करुन करुन घेऊ शकता. याचा एकंदर अर्थ असा की या बँकेत तुम्ही तुमची महत्वाची कामे करण्यासाठी साहाय्यक मिळवू शकता. एकट्या राहणाऱ्या व्यक्तींची सोबत करणे, डॉक्टर, मंदीर किंवा बागेत जाण्यासाठी सहकार्य करणे, रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास तेथे भरती होण्यास साहाय्य देणे आणि रुग्णालयात सेवा करणे, 2019 मध्ये या बँकेचा शुभारंभ झाला. तेव्हा केवळ 5 लोक खातेदार होते. आता बँकेच्या खातेदारांची संख्या 450 पर्यंत पोहचली आहे.

Comments are closed.