इंडो-युरोपियन फेडरेशनची बैठक
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात परस्पर संबंधांविषयी चर्चा केली जात आहे. संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण, मुक्त व्यापार तसेच द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध अशा विविध विषयांवर ही चर्चा केली जात आहे. या चर्चेचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेत भारताचे नेतृत्व केले. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे, असा संदेश जयशंकर यांच्याकडून शुक्रवारच्या चर्चेनंतर ‘एक्स’वरुन देण्यात आला आहे.
भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात मुक्त व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. हा करार उभयपक्षी लाभदायक असून त्यामुळे भारताचा युरोपियन महासंघाशी असणाऱ्या व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ होणे शक्य आहे. या कराराला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ किंवा ‘महाकरार’ असे संबोधण्यात येत आहे. हा करार या वर्षाच्या उत्तरार्धात कार्यान्वित होईल, अशी शक्यता आहे.
136 अब्ज डॉलर्सचा व्यापार
भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात सध्या प्रतिवर्षी 136 अब्ज डॉलर्सचा व्यापार होत आहे. भारताची युरोपियन महासंघाला निर्यात 76 अब्ज डॉलर्सची होत असून युरोपियन महासंघाकडून आयात 60 कोटी डॉलर्सची होत आहे. भारत आणि युरोपियन महासंघात धोरणात्मक भागीदारीही अनेक वर्षांपासून आहे.
Comments are closed.