कला केंद्राबाहेर मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा, एकाला मारहाण करत हवेत गोळीबार, 300 गावकऱ्यांचा जमाव
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण (Paithan) तालुक्यात थापटी तांडा येथे शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. कुलस्वामिनी कला केंद्राबाहेर काही मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घालत रस्त्याने जाणाऱ्या रजापूर येथील एका तरुणाला क्षुल्लक कारणावरून अडवून बेदम मारहाण केली.
मारहाण सुरू असतानाच आरोपींपैकी एकाने खिशातून बंदूक काढून हवेत गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज होताच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची बातमी अल्पावधीतच रजापूर गावात पोहोचली. घटनेची माहिती मिळताच तब्बल 300 गावकऱ्यांचा जमाव कुलस्वामिनी कला केंद्राकडे निघाला.
Chhatrapati Sambhajinagar Crime: संतप्त गावकऱ्यांचा कला केंद्रावर हल्ला
संतापलेल्या जमावाने केंद्राचा लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तोडफोड सुरू केली. केंद्रातील फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल, तसेच इतर विजेची उपकरणे फोडण्यात आली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या तोडफोडीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: तीन ते चार जण जखमी
दगडफेक आणि गोंधळादरम्यान तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. घटनेच्या वेळी कला केंद्रामध्ये डान्स कार्यक्रम सुरू होता आणि मोठी गर्दी उपस्थित होती. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला. सध्या रजापूर गावात तणावपूर्ण शांतता असून, परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.