इराण-इस्रायल युद्धाचा भडका: दुबई विमानतळावर अडकलेल्या ‘जन्नत’ फेम सोनल चौहानची पंतप्रधानांकडे मदतीची याचना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाती देशांमधील परिस्थिती कमालीची बिघडली असून, या युद्धाचा थेट फटका आता मनोरंजन सृष्टीलाही बसला आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या लष्करी तळांना आणि दुबईला लक्ष्य केल्यामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अल मकतूम विमानतळावरील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. या संकटामुळे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सोनल चौहान दुबई विमानतळावर अडकली असून तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीसाठी साद घातली आहे.

सोनल चौहानने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे आहे की, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे उड्डाणे रद्द झाली असून मायदेशी परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग उपलब्ध नाही. जगातील सर्वात व्यस्त मानले जाणारे दुबई विमानतळ बंद झाल्यामुळे सोनल चौहानसह हजारो प्रवासी तिथे अडकून पडले आहेत. या कठीण प्रसंगात हिंदुस्थान सरकारकडून मार्गदर्शनाची आणि सुरक्षित प्रवासाची अपेक्षा सोनलने व्यक्त केली आहे.

‘जन्नत’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय आहे. अलीकडेच ती ‘आदिपुरुष’ आणि ‘द घोस्ट’ सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये झळकली होती.

Comments are closed.