AUSvsIND: कारकिर्दीच्या शेवटच्या वनडेत ठोकले शतक, एलिसा हिलीच्या नावावर ‘या’ वर्ल्ड रेकॉर्डची झाली नोंद

ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली तिच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना आज (१ मार्च) खेळत आहे. या सामन्यात तिने दिडशतकी खेळी करत अप्रतिम कामगिरी केली आहे. होबार्टच्या ओव्हलमध्ये सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये तिने ही कामगिरी केली आहे. तिने सलामीला फलंदाजी करताना केवळ ७९ चेंडूतच शतक पूर्ण केले. त्याचबरोबर एक विश्वविक्रमही आपल्या नावे केला आहे. या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
एलिसाचे हे तिच्या वनडे कारकिर्दीतील आठवे शतक ठरले आहे. तसेच हे तिचे भारताविरुद्धचे तिसरे शकत आहे. तिने १८ चौकार मारत शतक पूर्ण केले. तिने ४९ चेंडूत अर्धशतक पूर्ण करताच नंतर स्फोटक फलंदाजी सुरू केली. हा सामना सुरू होण्याआधी भारतीय संघाने तिला गार्ड ऑफ ऑनर दिला होता.
एलिसा १५८ धावा करत बाद झाली. यामध्ये तिने ९८ चेंडूत २७ चौकार आणि २ षटकार मारले. तिला स्नेह राणाने बोल्ड केले. तिचे हे मागील ६ वनडे सामन्यांमधील तिसरे शतक ठरले आहे. तिने मागील वर्षी झालेल्या वनडे विश्वचषकात भारताविरुद्ध १४२ धावा आणि बांग्लादेशविरुद्ध ११३ धावा केल्या होत्या. तसेच तिने वनडेमध्ये भारतविरुद्ध अधिक धावा केल्या आहेत.
या शतकाबरोबर एलिसा महिला क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील वनडे शेवटच्या सामन्यात शतक करणारी दुसरीच खेळाडू ठरली आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या जोहमारी लॉगटेनबर्गने तिच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वनडेमध्ये शतकी खेळी केली होती. तिने २००७मध्ये नेदरलॅंड्सविरुद्ध नाबाद १५३ धावा (१५३ चेंडू) केल्या होत्या. १९९७मध्ये वेस्ट इंडिजच्या कॅरोल एन जेम्सने डेन्मार्कविरुद्ध दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या वनडेत ९९ धावांवर नाबाद राहिली होती.
एलिसा कारकिर्दीतील शेवटच्या वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरला आहे.
Comments are closed.