टी-20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तान OUT; तरीही करोडोंची कमाई! आकडा वाचून थक्क व्हाल, किती कोटी मिळणार

T20 वर्ल्ड कप 2026 मधून पाकिस्तानला किती पैसे? आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानचा प्रवास संपला असला, तरी संघाच्या खात्यात कोट्यवधींची बक्षीस रक्कम जमा होणार आहे. शनिवार 28 फेब्रुवारी रोजी सुपर-8 टप्प्यातील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला. मात्र उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी केवळ विजय पुरेसा नव्हता, 65 धावांच्या फरकाने जिंकणे गरजेचे होते. पाकिस्तानला फक्त 5 धावांनी विजय मिळवता आला आणि त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

किती मिळणार बक्षीस रक्कम?

आयसीसीकडून अद्याप अधिकृत बक्षीस रकमेची घोषणा झालेली नसली, तरी 2024 च्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा सुमारे 20 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विजेत्या संघाला अंदाजे 3 मिलियन अमेरिकी डॉलर (सुमारे 27.5 कोटी रुपये)

उपविजेत्याला सुमारे 1.6 मिलियन अमेरिकी डॉलर (सुमारे 14.65 कोटी रुपये)

पाकिस्तानच्या वाट्याला किती?

सुपर-8 मध्ये प्रवेश करताच पाकिस्तानने 3 लाख 80 हजार अमेरिकी डॉलर (अंदाजे 3.5 कोटी रुपये) इतकी रक्कम निश्चित केली होती. याशिवाय संघाने स्पर्धेत एकूण 4 सामने जिंकले. प्रत्येक विजयासाठी आयसीसीकडून सुमारे 26 लाख रुपये बोनस मिळत असल्याने या विजयांमधून साधारण 1.04 ते 1.19 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई होणार आहे. अशा प्रकारे, पाकिस्तानच्या खात्यात एकूण मिळून जवळपास 5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

स्पर्धेतील पाकिस्तानचा प्रवास

पाकिस्तानने गट टप्प्यात नेदरलँड्स, अमेरिका आणि नामिबियाचा पराभव केला आणि सुपर 8 मध्ये श्रीलंकेचा पराभव केला. सुपर 8 चा एक सामना पावसामुळे वाया गेला. शिवाय, गट टप्प्यात पाकिस्तान भारताकडून आणि सुपर 8 च्या टप्प्यात इंग्लंडकडून पराभूत झाला. उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले असले, तरी पाकिस्तानने स्पर्धेत लढाऊ वृत्ती दाखवत आर्थिकदृष्ट्या मात्र चांगली कमाई केली आहे.

पाकिस्तान बाहेर, न्यूझीलंड आत

सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला किमान 65 धावांनी विजय मिळवणे आवश्यक होता. त्यामुळं, पाकिस्तानी संघाला श्रीलंकेला 147 धावांचा टप्पा ओलांडता येणार नाही याची खात्री करावी लागली. एका क्षणी, श्रीलंकेने पहिले दोन विकेट लवकर गमावले, परंतु नंतर पवन रत्नायकेने अर्धशतक झळकावले, 37 चेंडूत 58 धावा केल्या. श्रीलंकेला 147 धावांवर रोखण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्याने, ते टी20 विश्वचषकातून बाहेर पडले. दुसरीकडे, न्यूझीलंडने नेट रन रेटच्या आधारे अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले आहे.

हे ही वाचा –

Israel vs Iran War Jonny Bairstow: आम्हाला घरी पोहोचवा…इराण-इस्रायल-अमेरिकेच्या युद्धात IPL मधील दिग्गज खेळाडू यूएईमध्ये अडकला, पंतप्रधानांकडे मागितली मदत

आणखी वाचा

Comments are closed.