ZIM vs SA: विजयी लय कायम ठेवणार आफ्रिका, की झिम्बाब्वे जाता जाता धक्का देणार?

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ फेरीत नाट्यमय घडामोडी घडल्या. पाकिस्तानने त्यांचा शेवटचा सामना श्रीलंकेवर ५ धावांनी रोमांचक विजय मिळवला. तथापि, हा विजय पाकिस्तानसाठी पुरेसा नव्हता. नेट रन रेटच्या गणनेत ते मागे पडले. संघाचे सेमीफायनलचे स्वप्न अपूर्ण राहिले.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलमध्ये स्थान मिळविण्यासाठी तीव्र शर्यत होती. पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक होते, परंतु ते घडले नाही. परिणामी, न्यूझीलंडने अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले, तर पाकिस्तानचा प्रवास सुपर ८ मध्ये थांबला.

दरम्यान, सुपर ८ फेरीतील शेवटचे दोन सामने आज रविवारी खेळले जातील. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे एकमेकांसमोर येतील. दक्षिण आफ्रिका आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे, तर झिम्बाब्वेचे आव्हान संपले आहे. त्यामुळे, हा सामना औपचारिक असला तरी तो निश्चितच प्रतिष्ठेचा असेल.

झिम्बाब्वेने गट टप्प्यात दमदार कामगिरी केली होती. ज्यात चारपैकी तीन सामने जिंकले होते. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका सारख्या संघांना धक्का दिला होता. पण सुपर ८ मध्ये त्यांना सलग दोन पराभवांना तोंड द्यावे लागले. आता ते दक्षिण आफ्रिकेला धक्का देऊ शकतात का हे पाहणे मनोरंजक असेल. दुसरीकडे, सुपर ८ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक साकारण्याच्या निर्धाराने दक्षिण आफ्रिका मैदानात उतरेल.

हा सामना रविवार, १ मार्च रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल, तर नाणेफेक दुपारी २.३० वाजता होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच, चाहते जिओहॉटस्टारद्वापे मोबाईलवर हा थरार थेट अनुभवू शकतात.

Comments are closed.