एकच तिकीट, दोन दावेदार! ‘क्वार्टर फायनल’मध्ये भारत-वेस्ट इंडिजमध्ये आरपारची लढत, जाणून घ्या अपड
India vs West Indies Scorecard Live Update In Marathi News : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज संध्याकाळी सेमीफायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या अखेरच्या संघाचा फैसला होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना प्रत्यक्षात ‘क्वार्टर फायनल’च मानला जात आहे. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर सायंकाळी 7 वाजल्यापासून दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत.
दोन्ही संघांच्या खात्यात सध्या प्रत्येकी 2 गुण आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ 4 गुणांसह थेट सेमीफायनलमध्ये धडक मारणार, तर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता, मात्र झिम्बाब्वेला पराभूत करून त्यांनी स्पर्धेतील आशा जिवंत ठेवल्या आहेत. म्हणूनच आजचा हा सामना अत्यंत निर्णायक ठरणार असून, चाहत्यांसाठी तो जबरदस्त थरार घेऊन येणार आहे.
Comments are closed.