Israel Iran War -इराण-इस्रायल युद्धाचा शहापूरच्या पर्यटकांना फटका; 23 नागरिक दुबईत अडकले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली असून, याचे गंभीर परिणाम हिंदुस्थानी पर्यटकांना भोगावे लागत आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील 23 ज्येष्ठ नागरिक सध्या दुबईमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व पर्यटक एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून दुबई सहलीसाठी गेले होते. 28 फेब्रुवारी रोजी रात्री 12:45 वाजता त्यांचे परतीचे विमान नियोजित होते, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे उड्डाणे रद्द झाल्याने हे सर्वजण दुबईत अडकले आहेत.

सध्या हे 23 नागरिक दुबईतील ‘ए 1 फहादी स्ट्रीट’वरील ग्रँड अॅस्टोरिया हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. पर्यटनाचा हा शेवटचा टप्पा असल्याने या ज्येष्ठ नागरिकांकडील प्रवासासाठीचे पैसे संपले आहेत. हॉटेलचे वाढीव बिल आणि दैनंदिन खर्चासाठी आता खिशात रक्कम शिल्लक नसल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. परदेशी भूमीवर अडकलेल्या या वृद्धांनी आता हिंदुस्थानी सरकारकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. हॉटेलचा खर्च देणे अशक्य झाल्याने आणि विमानसेवा अनिश्चित काळासाठी विस्कळीत असल्याने, केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून आम्हाला सुखरूप मायदेशी परत आणावे, अशी विनंती या हतबल पर्यटकांनी केली आहे.

Comments are closed.