Israel Iran War – खामेनी यांच्या मृत्युनंतर अलीरेझा अराफी यांची इराणने ‘सर्वोच्च नेते’ म्हणून नियुक्ती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात अली खामेनी यांच्या मृत्युनंतर इराणी धर्मगुरू अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इराणची वृत्तसंस्था ( ISNA) दिलेल्या वृत्तानुसार ते अंतरिम नेतृत्व परिषदेचे कायदेशीर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम करतील. संविधानानुसार, राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान, मुख्य न्यायाधीश गुलाम-होसेन मोहसेनी-एजेई आणि पालक परिषदेतील एक धर्मगुरू यांचा समावेश असलेली ही परिषद नवीन सर्वोच्च नेते निवड होईपर्यंत देशाचे नेतृत्व करेल.

तेहरानमध्ये अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणी धर्मगुरू अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला. अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची अंतरिम नेतृत्व परिषदेचे कायदेतज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इराणच्या संविधानानुसार नवीन नेता निवडला जाईपर्यंत संक्रमण काळात ही परिषद सर्वोच्च नेत्याची सर्व कर्तव्ये सांभाळेल. इराणच्या संविधानानुसार, अंतरिम परिषदेत अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, मुख्य न्यायाधीश गुलाम-होसेन मोहसेनी-एजेई आणि पालक परिषदेतील एक धर्मगुरू यांचा समावेश आहे. खामेनी यांच्या निधनानंतर इराण संक्रमणाच्या काळात प्रवेश करत असताना ही परिषद संयुक्तपणे देशाची जबाबदारी घेईल.

१९८९ पासून इराणवर राज्य करणारे ८६ वर्षीय खामेनी अमेरिका-इस्रायली लष्करी हल्ल्यात मारले गेले. या कारवाईत लष्करी तळ, सरकारी स्थळे आणि वरिष्ठ नेतृत्व स्थानांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात संरक्षण मंत्री अमीर नासरजादेह आणि कमांडर-इन-चीफ मोहम्मद पाकपूर यांच्याशी संबंधित लोकांचा समावेश होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सर्वप्रथम खमेनी यांच्या मृत्यूची घोषणा केली. इराणने रविवारी सकाळी खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यानंतर इराणी धर्मगुरू अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Comments are closed.