थलपती विजय आणि संगीता यांच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर मुलाच्या ‘त्या’ कृतीमुळे खळबळ
तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थलपती विजय सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला आहे. एकीकडे त्याचा आगामी चित्रपट ‘जाना नायगन’ सेन्सॉरशिपच्या कात्रीत अडकला असतानाच, दुसरीकडे त्याच्या 27 वर्षांच्या सुखी संसाराला तडा गेल्याच्या बातम्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. थलपती विजय आणि त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेने आता वेग घेतल्याचे चित्र दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता सोर्नालिंगम यांनी 24 फेब्रुवारी रोजी चेंगलपट्टू येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अधिकृत अर्ज दाखल केला आहे. या याचिकेमध्ये संगीता यांनी विजयवर एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केल्याचे वृत्त आहे. या बातमीने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडवून दिली असून विजयच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे ते म्हणजे विजयचा मुलगा संजय जॅसन याने सोशल मीडियावर घेतलेली भूमिका. सोशल मीडियावर विजय आणि संगीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, नेटिझन्सनी एक महत्त्वाची गोष्ट नोटीस केली आहे. थलपती विजयचा मुलगा संजय जॅसन याने इंस्टाग्रामवर आपल्या वडिलांना अनफॉलो केल्याचे समोर आले आहे. संजय सध्या इंस्टाग्रामवर अनुराग कश्यप आणि फरहान अख्तर यांसारख्या दिग्गज चित्रपट निर्मात्यांसह एकूण 38 जणांना फॉलो करत आहे, मात्र या यादीतून त्याचे वडील थलपती विजय यांचे नाव गायब असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
संजय जॅसनच्या या कृतीकडे अनेकांनी कौटुंबिक तणावाचे संकेत म्हणून पाहिले आहे. काही चाहत्यांच्या मते, संजयने वडिलांना अनफॉलो करून आपल्या आईला पाठिंबा दर्शवला आहे. तर दुसरीकडे, काही नेटिझन्स असाही दावा करत आहेत की संजय आधीपासूनच त्याच्या वडिलांना फॉलो करत नव्हता. या अनफॉलो प्रकरणावर अद्याप विजय किंवा त्याच्या कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. सध्या संपूर्ण तमिळ सिनेसृष्टीचे लक्ष या हाय-प्रोफाईल घटस्फोटाच्या प्रकरणाकडे लागले आहे.
Comments are closed.