ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूची वनडेतून निवृत्ती; भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ठोकलं शानदार शतक!

ऑस्ट्रेलियाची दिग्गज महिला क्रिकेटपटू एलिसा हिलीने (Elisa Hilly announcement retirement) एकदिवसीय (ODI) क्रिकेटला रामराम ठोकला आहे. 1 मार्च रोजी भारताविरुद्ध तिने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. आपल्या निवृत्तीच्या सामन्यात हिलीने 158 धावांची जबरदस्त शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला 185 धावांनी मोठा विजय मिळवून दिला.

एलिसा हिलीने कर्णधार पदावर असतानाच निवृत्ती जाहीर केली आहे. तिने या वर्षी जानेवारीतच जाहीर केले होते की, भारताविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर ती या फॉरमॅटमधून निवृत्त होईल. मूळची यष्टिरक्षक (Wicketkeeper) असलेल्या हिलीने आपल्या शेवटच्या वनडे सामन्यात विशेष बाब म्हणून 2 षटके गोलंदाजी देखील केली. तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारतावर 3-0 असा विजय मिळवत ही मालिका खिशात घातली.

या दौऱ्यात भारताने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली होती, तर ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेत 3-0 ने बाजी मारली. आता 6 मार्चपासून दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना एलिसा हिलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. तिने आपल्या निवृत्तीच्या तारखेचा खुलासा आधीच केला होता.

एलिसा हिलीची वनडे कारकीर्द:
समोर: 126
धावा: 3,777
शतके: 8 | अर्धशतके: 19
यष्टिरक्षण: 85 झेल आणि 38 स्टम्पिंग

तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 409 धावांचा डोंगर उभा केला होता. हिलीने 158 धावांच्या खेळीत 27 चौकार आणि 2 षटकार लगावले. तिने बेथ मुनीसोबत 145 धावांची भागीदारी केली. 410 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 224 धावांवरच गारद झाला. भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. एलिसा हिलीने निवृत्तीच्या सामन्यात केलेली 158 धावांची खेळी ही कोणत्याही महिला क्रिकेटपटूने आपल्या निवृत्तीच्या सामन्यात केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

Comments are closed.