Israel Iran War – खामेनी शहीद झाले, त्याचा बदला घेणार! लढाई लढतच राहणार; इराणी राष्ट्रापतींचा निर्धार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता व्यापक रुप घेत असल्याचे दिसत आहे. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहे. तसेच आता हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी शहीद झाले, त्याचा बदला घेणार. आम्ही लढाई लढतच राहणार, असा निर्धार इराणी राष्ट्रापती मसूद पेझेश्कियान यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला.

इराणी राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी राष्ट्राला संबोधित करताना म्हटले की, इराण शत्रूच्या लष्करी तळांविरुद्ध लष्करी कारवाया सुरू ठेवेल. त्यांनी हल्ले आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले की इराण अमेरिका, इस्रायलसह सर्व शत्रूंविरोधात खंबीरपणे उभा राहील आणि आपल्या नेतृत्वाने दाखवलेल्या मार्गावर चालत राहील. सर्वोच्च नेते अली खामेनी राष्ट्रासाठी शहीद झाले आहे. त्याचा बदला आपल्याला घ्यावाच लागेल. त्यांचे बलिदान वर्षानुवर्षे केलेल्या त्यागाची परिणति आहे. आता आपण निर्धाराने उभे राहत शत्रूला धडा शिकवूया, असे आवाहनही त्यांनी केले.

Comments are closed.