IND vs WI: शिमरॉन हेटमायरचा नवा विश्वविक्रम! भारताविरुद्ध षटकार ठोकून बनला टी20 वर्ल्ड कपचा नवा सिक्सर किंग

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज (india vs west indies) यांच्यातील सामन्यादरम्यान शिमरॉन हेटमायरने (Shimron hetmayar made history) नवा इतिहास रचला आहे. हा विश्वचषक हेटमायरसाठी अत्यंत धमाकेदार ठरला असून तो वेस्ट इंडीजसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
भारताविराुद्धच्या सामन्यात दोन षटकार ठोकताच हेटमायर आता टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. वेस्ट इंडीजची सुरुवात चांगली झाली होती, पण शाई होप बाद झाल्यानंतर हेटमायर मैदानात आला.
त्याने आल्यापासूनच आक्रमक फटकेबाजी सुरू केली. अवघ्या 12 चेंडूंमध्ये 225 च्या स्ट्राईक रेटने त्याने 27 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 2 षटकार लगावले. हेटमायर जबरदस्त फॉर्मात दिसत होता, मात्र जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर बॅटची कडा लागून तो झेलबाद झाला.
टी-20 वर्ल्ड कपच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू:
शिमरॉन हेटमायर १९ (२०२६)
साहिबजादा फरहान १८ (२०२६)
निकोलस पूरन १७ (२०२४)
ख्रिस गेल 16 (2012)
रहमानउल्ला गुरबाज १६ (२०२४)
Comments are closed.