T20WC2026: विराट कोहलीचा विक्रम मोडीत! झिम्बाब्वेच्या युवा ब्रायन बेनेटने जागतिक क्रिकेटमध्ये रचला इतिहास

झिम्बाब्वे क्रिकेट संघ नेहमीच आपल्या कर्णधारावर, सिकंदर रझावर (Sikandar Raza) अवलंबून असतो. पण टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मध्ये संघाला एक नवा स्टार फलंदाज मिळाला आहे. 22 वर्षीय सलामीवीर ब्रायन बेनेटने (Brayan bennet breaks Virat Kohli’s record) आपल्या फलंदाजीने सर्वांना थक्क केले असून भारतीय दिग्गज विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

ब्रायन बेनेटने या स्पर्धेत 6 डावांत 146 च्या सरासरीने 292 धावा केल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात (किमान 200 धावा करणाऱ्यांमध्ये) ही आतापर्यंतची सर्वोच्च सरासरी आहे. याआधी 2016 च्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने 136.50 च्या सरासरीने धावा केल्या होत्या, पण आता बेनेट या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत बेनेटने चांगली कामगिरी केली आहे. भारतांविरुद्ध: नाबाद 97, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 64, श्रीलंकेविरुद्ध नाबाद 63, ओमानविरुद्ध नाबाद 48 धावा केल्या आहेत. त्यात विशेष बाब म्हणजे 6 सामन्यांपैकी तो 4 वेळा नाबाद राहिला. त्याला केवळ वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज बाद करू शकले.

ब्रायन बेनेटने केवळ टी-20 मध्येच नव्हे, तर वनडे आणि कसोटीतही आपली छाप पाडली आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला सिकंदर रझानंतर झिम्बाब्वे क्रिकेटचा खरा वारसदार आणि भविष्य म्हटले जात आहे.

Comments are closed.