T20WC2026: टी-20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीचा संघाला मोठा फटका; ‘या’ दिग्गजाने अचानक सोडली संघाची साथ!

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवू शकला नाही. सुपर-8 मधील आपल्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानकडून श्रीलंकेला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर आणि स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर श्रीलंकेच्या क्रिकेटमधील एका दिग्गज व्यक्तिमत्त्वाने संघाची साथ सोडली आहे.

रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या (Sanath jaysurya) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अद्याप श्रीलंका क्रिकेट बोर्डाला अधिकृतपणे कळवले नसले तरी, हा विश्वचषक प्रशिक्षक म्हणून त्यांचा शेवटचा काळ असेल हे त्यांनी आधीच ठरवले होते.

जयसूर्या यांनी सांगितले की, आता ही जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवण्याची वेळ आली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी इंग्लंड मालिकेदरम्यानच मी ठरवले होते की, मी या पदावर जास्त काळ राहणार नाही. मला वाटले होते की विश्वचषकात चांगली कामगिरी करून मी निरोप घेईन, पण तसे होऊ शकले नाही, याचे मला दुःख आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, माझा करार जूनपर्यंत आहे. मी अद्याप बोर्डाला अधिकृत बातमी दिलेली नाही, त्यांना माझ्या या निर्णयाची कल्पना नाही. मला त्यांच्याशी बोलावे लागेल. जर ते नवीन कोणाची नियुक्ती करू शकत असतील, तर त्यांनी ती नक्कीच करावी.

लीग स्टेजमध्ये श्रीलंकेने चारपैकी तीन सामने जिंकून सुपर-8 मध्ये धडक मारली होती. तर सुपर-8 ही फेरी संघासाठी अत्यंत वाईट ठरली; श्रीलंकेला या टप्प्यात एकही सामना जिंकता आला नाही.

Comments are closed.