मी सामने खेळण्यापेक्षा, बाहेर जास्त…; टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवताच संजूने सगळं बोलून

संजू सॅमसन IND vs WI T20 विश्वचषक 2026 : रविवारी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात भारताचा फलंदाज संजू सॅमसनने एक तुफानी कामगिरी केली. वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते आणि सॅमसनने 50 चेंडूत 97 धावा करून भारताला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश दिला. भारतासमोर 196 धावांचे आव्हान होते. धावांचा पाठलाग करताना संघाने 19.2 षटकांत लक्ष्य गाठले. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील हा भारताचा सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग होता. कोलकात्याच्या प्रेक्षकांसमोर सॅमसनने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार स्वीकारताना सॅमसनच्या डोळ्यात पाणी आले.

संजू सॅमसन काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला की, हे माझ्यासाठी अक्षरशः संपूर्ण जगासारखं आहे. मी जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं. आजचा हा दिवस म्हणजे मी ज्याची वाट पाहत होतो तोच दिवस आहे. मी खूप खूप आभारी आहे. माझा प्रवास नेहमीच चढ-उतारांनी भरलेला. अनेकदा स्वतःवर शंका घेतली, मनात प्रश्न यायचे… “मी करू शकेन का? मी यशस्वी होऊ शकेन का?” पण मी विश्वास ठेवत राहिलो. परमेश्वराच्या कृपेने आजचा दिवस मला पाहायला मिळाला, यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे.

रोहित -विराटपासून प्रेरणा….

पुढे तो म्हणाला की, मी हा फॉरमॅट खूप वर्षांपासून खेळतो आहे. आयपीएलमध्ये जवळपास 10-12 वर्षे खेळलो आणि गेल्या 10 वर्षांत देशासाठीही खेळण्याचा अनुभव घेतला. काही काळ संघात खेळण्याची संधी मिळाली नाही, पण त्या काळात डगआउटमधून सामना पाहताना बरेच काही शिकलो. विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या महान खेळाडूंना जवळून पाहण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. ते सामन्याची परिस्थिती कशी ओळखतात, खेळ कसा बदलतात, शेवट कसा करतात, हे सगळं निरीक्षणातून शिकता आलं. मी कदाचित 50-60 सामने खेळलो असेन, पण 100 हून अधिक सामने जवळून पाहिले आहेत. त्या अनुभवाने मला खूप मदत झाली.

आजचा सामना वेगळा होता –  संजू सॅमसन

शेवटी तो म्हणाला की, मागील सामन्यात आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करत होतो, त्यामुळे मोठा स्कोर उभा करणे गरजेचे होते. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळण्याचा विचार होता. पण आजचा सामना वेगळा होता. मी थोडं गती वाढवण्याचा प्रयत्न करताच विकेट्स पडू लागल्या. त्यामुळे भागीदारी बांधणं महत्त्वाचं होतं. मी फक्त माझी भूमिका पार पाडण्यावर लक्ष दिलं, प्रत्येक चेंडू स्वतंत्रपणे खेळण्याचा प्रयत्न केला. काहीतरी विशेष घडेल असं वाटलं नव्हतं, पण  विश्वास ठेवला आणि आज सगळं उत्तम घडलं.

हे ही वाचा –

Sanju Samson News : टीम व्यवस्थापनेला नको असलेल्या संजू सॅमसनची तुफानी खेळी! वाघानं भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचवलं, सूर्याचा वाकून नमस्कार

आणखी वाचा

Comments are closed.