जम्मू-काश्मीरमध्ये ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप

दोडा:

जम्मू काश्मीरच्या डोंगराळ दोडा जिह्यात रविवारी पहाटे 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या आपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा धक्का मध्यरात्री 1:25 वाजता जाणवला. भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पाच किलोमीटर खाली होते, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या दोन आठवड्यात जाणवलेला हा दुसरा धक्का होता. नव्याने जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता सौम्य असली तरी काही लोकांना याची जाणीव झाल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed.