सामना जिंकवताच झटपट गेला, गुडघ्यावर बसला; ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय केलं?, डोळे पाणावणारा VID

संजू सॅमसन ड्रेसिंग रूम व्हिडिओ IND vs WI : भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत दमदार एन्ट्री केली आहे. वेस्ट इंडिजने दिलेलं 196 धावांचं आव्हान भारताने 5 गडी गमावत यशस्वीरीत्या पार केलं. या ऐतिहासिक विजयाचा खरा नायक ठरला संजू सॅमसन. डावाची सुरुवात करत त्याने नाबाद 97 धावांची अफलातून खेळी करत भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. संघाला विजय मिळवून दिल्यानंतर संजू सॅमसनचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ड्रेसिंग रूममधील तो क्षण…

सामना जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावरही संजूचे भावनिक दृश्य पाहायला मिळाले. ड्रेसिंग रूममध्ये शिरताच तो पुन्हा गुडघ्यावर बसला आणि त्याने देवाचे आभार मानले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, चाहत्यांचे डोळे पाणावणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संजू सॅमसनने मोडला विराट कोहलीचा विक्रम

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीने 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे नाबाद 82 धावा केल्या होत्या. तसेच 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न येथेही 82 धावांची नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता.

मात्र, आता संजू सॅमसनने हा विक्रम मागे टाकत इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात त्याने अवघ्या 50 चेंडूमध्ये नाबाद 97 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 4 षटकार ठोकले. त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. याचबरोबर 2016 च्या टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवाचा हिशोबही भारताने चुकता केला.

टीकाकारांना बॅटनेच दिलं उत्तर

स्पर्धेच्या सुरुवातीला संजू सॅमसनच्या फॉर्मबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र करो या मरोच्या सामन्यात त्याने टीकाकारांना आपल्या बॅटनेच उत्तर दिलं. विजयाचा चौकार मारल्यानंतर संजू मैदानातच बसला, देवाचे आभार मानले आणि भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याचा हा भावनिक क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे ही वाचा –

T20 World Cup 2026 Semi Final Schedule : 4 संघ, 3 सामने, 3 मैदान…; सेमीफायनलमध्ये कोण कोणाविरुद्ध आणि कुठे भिडणार?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.