संजू सॅमसनने सामना जिंकल्यानंतर कुणाला केला फोन? महेंद्रसिंह धोनी तर नव्हता ना?

आयसीसी टी२० विश्वचषकापूर्वी फॉर्म शोधत असलेल्या संजू सॅमसनने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवण्यासाठी एक परिपूर्ण दिवस निवडला. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सामना ‘करो या मरो’ असा होता आणि टीम इंडियाची संपूर्ण फलंदाजी क्रम डळमळीत झाला होता. एका टोकावर एकट्याने उभे राहून सामना पलटला.
१९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या जोरावर भारताने १९.२ षटकांत ५ गडी गमावून विजय मिळवला. त्याने गोलंदाजांना धूळ चारली आणि सेमीफायनलमध्ये भारताचे स्थान निश्चित केले.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर मिळालेल्या या संस्मरणीय विजयानंतर सामना संपताच सॅमसनने सर्वप्रथम कुणाला फोन केला, याची उत्सुकता चाहत्यांना होती. काहींना वाटले की तो कॉल माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना असेल. मात्र प्रत्यक्षात सॅमसनने व्हिडिओ कॉल आपल्या पत्नी चारुलता हिला केला. पुरस्कार स्वीकारताना तो तिच्याशी संवाद साधताना दिसला. बालपणीची मैत्रीण आणि जीवनसाथी असलेल्या चारुलतासोबत हा खास क्षण शेअर करत सॅमसनने विजय अधिक संस्मरणीय केला.
करो या मरो सामन्यात, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ गडी गमावून १९५ धावा केल्या. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताने दिलेले हे सर्वोच्च लक्ष्य होते. टीम इंडियाने यापूर्वी कधीही इतके मोठे लक्ष्य गाठले नव्हते, परंतु संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांमुळे हे सोपे वाटले. विकेट पडत राहिल्या आणि इतर कोणताही फलंदाज ३० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. संजू सॅमसनने ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Comments are closed.