Israel USA Iran strike – हल्ल्यासाठी शनिवार सकाळचीच निवड का?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी हे त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांशी चर्चा करत असल्याची खात्री पटताच, इस्रायल आणि अमेरिकेने तेहरानविरुद्ध आपली हवाई आणि नौदल मोहीम सुरू केली, असे वृत्त रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खामेनी यांना लपण्याची संधी मिळू नये आणि हल्ल्यातील ‘सरप्राईज एलिमेंट’ कायम राहावा, यासाठी सर्वात आधी खामेनी यांच्यावरच हल्ला करणे आवश्यक होते. खामेनी यांची त्यांच्या सल्लागारांसोबतची बैठक मुळात शनिवारी संध्याकाळी होणार होती, परंतु इस्रायली गुप्तचर यंत्रणांना ही बैठक शनिवारी सकाळीच होणार असल्याची माहिची मिळाली आणि त्यानुसार हल्ल्याची वेळ बदलून ती शनिवार सकाळी आणण्यात आली. ही बैठक नेमकी कोणत्या ठिकाणी होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तेहरानमधील खामेनी यांच्या अत्यंत सुरक्षित असलेल्या निवासस्थानावर (कॉम्प्लेक्स) मोहिमेच्या सुरुवातीलाच हल्ला करण्यात आला. सॅटेलाइट फोटोंद्वारे हे निवासस्थान पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इराणमधील ४६ वर्षांच्या शिया-धार्मिक राजवटीसाठी हा एक मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. या हल्ल्यानंतर इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे.
इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्रायलसह कतार, बहरीन, संयुक्त अरब अमिराती (UAE), जॉर्डन आणि कुवेतमधील अमेरिकी सैन्यस्थळ तसेच हवाई तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये मध्यरात्रीनंतर (इराणमध्ये दिवसा) या हल्ल्याचे आदेश दिले. ओमानच्या मध्यस्थीने जिनिव्हा येथे झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर दोनच दिवसांत ही कारवाई करण्यात आली.
बदला घेण्याचा इराणचा निर्धार
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) खामेनी यांच्या ‘मृत्यूचा’ बदला घेण्याची शपथ घेतली आहे. अमेरिकेवर आणि इस्रायलवर इतिहासातील सर्वात भीषण हल्ला करण्याची धमकी त्यांनी दिली आहे. ‘इमामच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही, इराण सूड घेईल’, असे आयआरजीसीने आपल्या टेलिग्राम चॅनेलवर म्हटले आहे.
इस्रायलने दावा केला आहे की, या हल्ल्यात खामेनी यांच्यासोबत त्यांचे विश्वासू सहकारी अली शमखानी आणि आयआरजीसी कमांडर मोहम्मद पाकपूर हे देखील मारले गेले आहेत. अली लारीजानी या हल्ल्यातून वाचले असून त्यांनी ‘इराण आंतरराष्ट्रीय दडपशाही करणाऱ्यांना विसरता येणार नाही असा धडा शिकवेल’, असा इशारा दिला आहे.
इराणी सरकारी टीव्हीने खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांच्या आठवणीत काळ्याफित लावून कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत. या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातीचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ‘इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेला खामेनी संपला आहे’, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे.
खामेनी हे इराणच्या क्रांतीचे जनक रुहोल्ला खोमेनी यांचे उत्तराधिकारी होते आणि १९८९ पासून त्यांनी पाश्चिमात्य प्रभावाविरुद्ध कडक भूमिका घेतली होती. इराणच्या सरकारी माध्यमांकडून त्यांच्या मृत्यूचे वर्णन ‘गार्डियनचे बलिदान’ असे केले जात आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात इराणमध्ये महागाईविरुद्ध झालेल्या जनआंदोलनांना सरकारने क्रूरपणे चिरडले होते, ज्यात हजारो लोक मारले गेल्याचे बोलले जाते.
इस्रायलने इराणवर हल्ला केला अयातुल्ला अली खामेनी मारला तेहरान युद्ध सामना बातम्या अपडेट्स
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी तेहरानमध्ये अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात ठार झाले. मध्यपूर्वेतील तणाव वाढल्याने irgc बदला घेण्याची शपथ घेते. सामना वरील नवीनतम अपडेट्स वाचा.
कीवर्ड:
सामना, सामना, सामना, दैनिक सामना, मराठी बातम्या, इस्रायल इराण युद्ध, अली खामेनी मारला गेला, आयआरजीसी बदला, डोनाल्ड ट्रम्प, मध्य पूर्व संघर्ष बातम्या.
Comments are closed.