Israel Iran War – कुवैतमध्ये अमेरिकन लढाऊ विमान जेट F 15 कोसळले; प्रसंगावधानाने पायलट बचावला
कुवैतच्या हवाई हद्दीत एक अमेरिकन लढाऊ विमान कोसळल्याचे वृत्त आहे. कुवैतच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे एफ-15 लढाऊ विमान कोसळल्याचे वृत्त आले आहे. प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्या परिस्थितीबद्दल विविध चिंता व्यक्त केल्या जात आहेत. हा अपघात तांत्रिक बिघाड, ऑपरेशनल त्रुटी किंवा इतर कारणांमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, नेमक्या कराणांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. अपघाताच्या वेळी प्रसंगावधान राखत पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला आहे.
या घटनेमुळे कुवैतच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चुकीची ओळख पटवल्यामुळे हा अपघात झाला का, अशी शक्यताही व्यक्त होत आहेत. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि शत्रूच्या विमानांना रोखण्यासाठी डिझाइन केलेली पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली, क्वचित प्रसंगी, त्याच्या रडार आणि IFF (मित्र किंवा शत्रू ओळख) प्रणाली चुकीची ओळखू शकते. या प्रणालींमधील कमकुवतपणा किंवा संप्रेषण व्यत्ययांमुळे मित्र विमानांनाही शत्रू विमान समजले जाऊ शकते. त्यामुळे अपघात झाला का अशी चर्चा होत आहे.
आयएफएफ सिग्नल योग्यरित्या मिळाला नाही किंवा रडार डेटामध्ये गोंधळ झाला तर हवाई संरक्षण प्रणाली मित्र राष्ट्रांच्या विमानाला संभाव्य धोका समजू शकते आणि त्यावर हल्ला करू शकते. तथापि, अद्याप कोणताही तपशीलवार तपास अहवाल जारी केलेला नाही. विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी लष्करी आणि तांत्रिक संस्था अपघाताची चौकशी करत आहेत.
Comments are closed.