न खेळताच मेदवेदेव अजिंक्य, टॅलोन ग्रीक्सपूरची हॅमस्ट्रिंगमुळे फायनलमधून माघार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अंतिम सामना सुरू होण्याआधीच निकाल लागला आणि डॅनिल मेदवेदेवच्या खात्यात आणखी एक विजेतेपद जमा झाले. दुबई डय़ुटी फ्री टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीतून टॅलोन ग्रीक्सपूरने डाव्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याने मेदवेदेवला अंतिम सामना न खेळताच किताब उंचावण्याची संधी लाभली.

ग्रीक्सपूरला उपांत्य फेरीत आंद्रेई रुब्लेवविरुद्ध खेळताना दुखापत झाली. एका सर्व्हनंतर तो विचित्र पद्धतीने उतरल्यानंतर त्रास सुरू झाला. सरळ सेटमध्ये विजय मिळवूनही तो अंतिम सामन्यासाठी तंदुरुस्त होऊ शकला नाही. स्पॅनमध्ये गंभीर समस्या दिसली. त्यामुळे कोर्टवर उतरणे शक्य नव्हते, अशी खंत त्याने व्यक्त केली.

मेदवेदेवसाठी हा कारकीर्दीतील 23 वा किताब ठरला. 2026 हंगामातील दुसरे विजेतेपद पटकावत त्याने दुबईत दुसऱयांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. एकाच स्पर्धेत दोनदा जिंकण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव. ‘हेच तर वेडेपण आहे आणि तेही वॉकओव्हरने,’ असे तो हसत म्हणाला.

Comments are closed.