अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर भीषण ड्रोन हल्ला; रावळपिंडीसह अनेक लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा

अफगाण हवाई दलाच्या ड्रोन विमानांनी पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर भीषण हल्ले केले आहेत. यामध्ये रावळपिंडीतील नूर खान एअरबेस, क्वेटा येथील १२ व्या कोअरचे मुख्यालय, खैबर पख्तूनख्वामधील मोहमांड एजन्सीमधील खोविझू कॅम्प आणि घुलनी लष्करी तळांचा समावेश आहे. हे सर्व तळ पाकिस्तानचे महत्त्वाचे संरक्षण आणि ऑपरेशनल सेंटर्स मानले जातात.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टद्वारे माहिती दिली की, पाकिस्तानी लष्कराने अलीकडेच केलेल्या हवाई घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘आज राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील मुख्य लष्करी तळांविरुद्ध अचूक आणि समन्वित हवाई मोहीम राबवली. यात रावळपिंडीतील नूर खान एअरबेस, क्वेटा (बलुचिस्तान) मधील १२ व्या डिव्हिजनचे मुख्यालय, खैबर पख्तूनख्वामधील ख्वाझाई कॅम्प आणि इतर महत्त्वाच्या लष्करी सुविधा आणि कमांड सेंटर्सना लक्ष्य करण्यात आले’.

‘प्राथमिक अंदाजानुसार, या हल्ल्यांमुळे नियोजित लक्ष्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानी लष्कराने काल रात्री आणि आज पहाटे काबुल, बाग्राम आणि इतर भागात केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. हे स्पष्ट करण्यात येत आहे की, आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन किंवा पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमक कृतीला यापुढेही सडेतोड आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल’, असेही मंत्रालयाने पुढे स्पष्ट केले.

अफगाणिस्तानने यावेळी एका आत्मघाती (kamikaze) ड्रोनचा व्हिडिओ आणि पाकिस्तानी एअरबेसचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत.

दोन्ही देशांमध्ये ‘खुले युद्ध’

पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह प्रमुख शहरांवर बॉम्बफेक केल्यानंतर ही परिस्थिती उद्भवली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दोन्ही शेजारी देश आता ‘खुल्या युद्धात’ असल्याचे घोषित केले आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की त्यांनी हवाई हल्ल्यात २७० हून अधिक तालिबान फायटर्सना ठार केले आणि ४०० हून अधिक जणांना जखमी केले. दुसरीकडे, तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्ला मुजाहिद यांनी दावा केला की त्यांच्या दलाने ५५ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले असून पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लष्करी लक्ष्यांना यशस्वीपणे टार्गेट केले आहे.

पाकिस्तानी लढाऊ विमान पाडल्याचा दावा

गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष तीव्र झाला आहे. अफगाण दलाने जलालाबादवर एक पाकिस्तानी लढाऊ विमान पाडल्याचा आणि त्याच्या वैमानिकाला जिवंत पकडल्याचा दावा केला आहे. पूर्व अफगाणिस्तानमधील लष्करी प्रवक्ते वाहिदुल्ला मोहम्मदी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, पाकिस्तानने अफगाणिस्तानचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या रावळपिंडी एअरबेसवर ड्रोन हल्ला केला

अफगाण वायुसेनेने ड्रोन हल्ले करून पाकिस्तानच्या नूर खान एअरबेस आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य केले. सीमा संघर्ष वाढत असताना 55 पाक सैनिक मारल्याचा तालिबानचा दावा आहे. सामना वरील ताज्या बातम्या.

Keywords: Tezzbuzz, samana, samna, daily Tezzbuzz, दैनिक सामना, सामना, afghanistan pakistan war, drone strikes on pakistan, taliban vs pakistan army, nur khan airbase attack, durand line conflict, marathi news updates.

Comments are closed.