…तर मी पद सोडण्यासाठी तयार, पराभवामुळे निराश जयसूर्याची प्रशिक्षकपद सोडण्याची इच्छा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टी-20 विश्वचषकमधील निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्याने पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानविरुद्ध सुपर-8 मधील अखेरच्या सामन्यात पाच धावांनी झालेल्या पराभवानंतर जयसूर्याने श्रीलंकन क्रिकेटला माझ्यापेक्षा चांगला पर्याय मिळाला तर मी बाजूला होण्यास तयार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.

संघाच्या पराभवाच्या खुणा प्रत्येकाच्या चेहऱयावरच नव्हे तर हृदयावरही कोरल्या गेल्या होत्या. त्यामुळे जयसूर्याने प्रशिक्षक म्हणून अत्यंत निराश असल्याचे सांगितले. सातत्य आणण्यासाठी अजून खूप मेहनत घ्यावी लागेल, असेही जयसूर्या म्हणाला. दबावाच्या क्षणी संघ कोलमडतो, हे मान्य करत त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी विभागाने एकसंधपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली.

यशानंतरची घसरण

जयसूर्याच्या कारकीर्दीची सुरुवात दिमाखदार झाली होती. 2024 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध 27 वर्षांनंतर एकदिवसीय मालिका जिंकली, ओव्हलवर ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला आणि न्यूझीलंडला घरच्या मैदानावर 2-0 ने हरवले, पण त्यानंतर आले घसरणीचे दिवस. आशिया चषकातील अपयश, तिरंगी मालिकेतील खराब कामगिरी, इंग्लंडविरुद्ध 3-0 पराभव आणि आता घरच्या मैदानावर वर्ल्ड कपमध्ये सुपर एटमध्ये पत्करावा लागलेला पराभव. ही घसरण या स्पर्धेच्या निमित्ताने थांबवण्याचे प्रयत्न पह्ल ठरले.

आता 13 मार्चपासून शारजाहमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध मालिका सुरू होत आहे. जयसूर्या त्या मालिकेत प्रशिक्षकपदी कायम राहील का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र  तो सध्याच्या स्थितीने व्यथित आहे आणि संघाला नवी दिशा हवी, याची जाणीव असल्यामुळे आगामी मालिकेत तोच पद सांभाळण्याची दाट शक्यता आहे.

Comments are closed.