VIDEO: अरे भावा, बॅट तर दे! वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यावेळी जेव्हा रिंकू घेऊन गेला संजूची बॅट

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मधील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याती सर्वांनाच प्रतिक्षा होती. या सुपर-८च्या सामन्यानंतर उपांत्य फेरीत जाणारा संघ ठरणार होता. रविवारी (१ मार्च) कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत १९५ धावासंख्येचा डोंगर उभाला होता. यावेळी लक्ष्याचा विजयी पाठलाग करताना संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची खेळी केली. या सामन्यादरम्यान असे काही घडले ते पाहून हसू आवरता आले नाही.
या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या संजूने एक बाजू लढवत संघाला विजय मिळवून दिला. त्याने ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकार मारले. यावेळी भारताचा एकही फलंदाज ३० पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. असे असले तरी भाररताने उपांत्य फेरीत जागा पक्की केली. यावेळी सामना सुरू असताना ड्रिंक्स ब्रेकदरम्यान रिंकू सिंग पाणी आणि टॉवेल घेऊन आला. त्याच्यासोबत कुलदीप यादवही होता.
तेव्हा संजूने टॉवेल वापरण्यासाठी रिंकूला त्याची बॅट दिली. संजूने पाणी पिले आणि फलंदाजी करण्यासाठी क्रिजकडे वळाला. काही पावले जाताच त्याला लक्षात आले की बॅट तर आणलीच नाही. तो पळत रिंकूकडे गेला तेव्हा रिंकू त्याची बॅट घेऊन जाताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्यण घेतला होता. वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेजच्या ४० धावा, कर्णधार शाय होपच्या ३२ धावा, रोवमन पॉवेलच्या नाबाद ३४ धावा आणि जेसन होल्डरच्या नाबाद ३७ धावांच्या जोरावर १९५ धावा केल्या होत्या. यावेळी भारतीय गोलंदाजांनी सुरूवात चांगली केली होती, मात्र १५ षटकानंतर वेस्ट इंडिजने धावांचा वेग वाढवला. जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेतल्या.
हा सामना भारताने जिंकला असल्याने ते सुपर-८च्या ग्रुप-१ मध्ये दुसऱ्या स्थानावर आले आहेत. यामुळे उपांत्य फेरीत त्यांचा सामना पुन्हा एकदा इंग्लंंडशी होणार आहे. हा सामा ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हे दोन संघ २०२२च्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत समोरा-समोर आले होते. तेव्हा इंग्लंड जिंकला होता.
Comments are closed.